केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्यामार्फत नवी दिल्ली येथील 'भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेमध्ये (Indian Institute of Tropical Meteorology - IITM)' नुकतेच 'वातावरणीय रसायनशास्त्र आणि एरोसोल विषारीपणा विश्लेषण प्रयोगशाळेचे (Atmospheric Chemistry and Aerosol Toxicity Analysis Laboratory - AATAL)' उद्घाटन करण्यात आले आहे. 

ठळक मुद्दे:

  • डॉ. जितेंद्र सिंह [केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालय] नवी दिल्ली येथील IITM मध्ये 'AATAL' चे उद्घाटन केले आहे. 
  • ही अशा प्रकारची जगातील पहिलीच एकात्मिक प्रयोगशाळा ठरली आहे.
  • AATAL ही एक विशेष सुविधा आहे जी वातावरणीय रसायनशास्त्र आणि एरोसोलच्या (हवेतील सूक्ष्म कण) विषारीपणाचे विश्लेषण करण्यासाठी सज्ज आहे. 
  • दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात वायू प्रदूषणाचे स्रोत रिअल-टाइम (थेट) पद्धतीने शोधण्यास ही प्रयोगशाळा मदत करते.